best news portal development company in india

शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या कालवा अस्तरीकरणाला तीव्र विरोध; दहिवडी–शहा परिसरात हजारो ग्रामस्थ रस्त्यावर…

SHARE:

प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर ———————————————————————-

सिन्नर:तालुक्यातील दहिवडी ते शहा परिसरात सुरू असलेल्या पाटाच्या (कालव्याच्या) अस्तरीकरणाच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित काम बंद पाडले आहे. सदर अस्तरीकरणामुळे शेतकऱ्यांच्या शेती, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह व पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत हांडेवाडी, पवारवाडी, शहा परिसरातील हजारो ग्रामस्थ एकवटले.


      या कालव्याचे अस्तरीकरण हे शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असून यामुळे जमिनीची निचरा क्षमता कमी होऊन पाणी अडवले जाईल, शेतीतील ओलावा नष्ट होईल व पिकांवर विपरीत परिणाम होईल, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्लास्टर व अस्तरीकरणाचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी करत प्रत्यक्ष काम बंद पाडले.
घटनास्थळी ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात चर्चा सुरू असून निर्णय होईपर्यंत काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे.
   या आंदोलनाच्या वेळी सोमनाथ पुंजाजी चांदगुडे, मुरलीधर घुमरे (सरपंच हांडेवडी), ज्ञानेश्वर डेंगळे (माजी सरपंच रामपूर), संदीप धारणकर (पोलीस पाटील), गोकुळ पवार, राहुल दंडवते, विश्वास गायखे, संदीप चांदगुडे, अशोक चांदगुडे, दत्तात्रय जाधव, दत्तात्रेय घुमरे, विक्रम नरोडे, नवनाथ नरोडे, ऋषिकेश गव्हाणे, भाऊसाहेब ब. चव्हाण, भाऊसाहेब का. चव्हाण, नवनाथ चव्हान, कृष्णा चव्हान, सचिन चव्हाण, किसन चव्हाण, श्रीकृष्ण नरोडे, कृष्णा पवार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
      दरम्यान, “शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे कोणतेही काम सहन केले जाणार नाही. प्रशासनाने ग्रामस्थांचा विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. पुढील घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई