best news portal development company in india

गोदावरी कालव्याच्या सिमेंट प्लास्टर कामाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; खासदार राजाभाऊ वाजे यांची शेतकऱ्यांच्या लढ्याला ठाम साथ…!

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर:सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यावर सुरू असलेल्या सिमेंट प्लास्टरच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. या कामामुळे शेतकऱ्यांच्या हितास बाधा पोहोचणार असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.


या वेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका पूर्णतः मान्य असल्याचे स्पष्ट करत, “शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असलेल्या या कामाला माझा ठाम विरोध राहील. शेतकरी जे आंदोलन करतील, जो मार्ग निवडतील, त्या प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या सोबत असेन,” असा शब्द शेतकऱ्यांना दिला.

तसेच या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची तपासणी करून संबंधित खात्यांकडे जाब विचारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
या भेटीसाठी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील विविध गावांमधील सरपंच, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रामपूर, हांडेवाडी, चासनळी, पवारवाडी, कारवाडी, शहा, वडाचीवाडी आदी गावांतील प्रतिनिधींनी एकत्र येत या प्रश्नावर आपली ठाम भूमिका मांडली.
सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्याच्या सिमेंट प्लास्टर कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होऊन शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती केली.
या आंदोलनाला अधिक व्यापक पाठबळ मिळावे यासाठी सर्व शेतकरी लवकरच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे तसेच भाजपचे नेते बिपिनदादा कोल्हे यांची भेट घेऊन या लढ्यात सहभागी होण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आता पूर्णतः आक्रमक झाल्याचे चित्र असून नाशिकचे खासदार तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडे अधिकृतरित्या साकडे घालून या कामाला विरोध दर्शविण्यात आला आहे.
गोदावरी कालव्याच्या सिमेंट प्लास्टर कामावरून आगामी काळात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, या प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई