प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे,”एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर: तालुक्यातील कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील भूमिपुत्रांचा गौरव करणारा भव्य सन्मान सोहळा उदय भाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात पार पडला. भारतरत्न, माजी पंतप्रधान तथा स्फूर्तीस्थान श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कवी संमेलनासह सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 17 डिसेंबर रोजी सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी, सिन्नर येथे पार पडलेल्या या दैदिप्यमान कार्यक्रमाला कला, साहित्यप्रेमी व रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतींना अभिवादन करत साहित्य, कला व संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्यात इंडियाज गॉट टॅलेंट फेम श्री. हर्षदजी गोळेसर, सौ. दुहिता हर्षदजी गोळेसर, तसेच कवी किरणजी भावसार आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कवी किरणजी भावसार यांच्या हृदयस्पर्शी काव्यरचनांनी उपस्थितांचे मन हेलावून टाकले; सभागृहात साहित्यिक भावनांचा साक्षात्कार घडला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजक उदय भाऊ सांगळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कवी, कलाकार व रसिकांचे मनापासून आभार मानले. साहित्य, कला आणि संस्कृतीचा गौरव करणारा हा सोहळा सिन्नरच्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक अविस्मरणीय पर्व ठरला.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





