best news portal development company in india

गौतम पब्लिक स्कूलची तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात दैदिप्यमान कामगिरी…
चित्रकला स्पर्धेत प्रथम, गणित-विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी :कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन दिनांक २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत के. जी. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे उत्साहात पार पडले. या प्रतिष्ठित प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी यांनी उल्लेखनीय यश संपादन करत चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर गणित व विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या अनूर शेख यांनी दिली.


   चित्रकला प्रदर्शनात विद्यार्थी सागर मोरे यांनी सादर केलेल्या सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या प्रभावी चित्राला परीक्षकांनी प्रथम क्रमांक बहाल केला. समाजाला जागरूक करणारा सशक्त संदेश देणारे हे चित्र विशेष लक्षवेधी ठरले.
    गणित व विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी कुशारे समर्थ याने सादर केलेल्या ‘एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट’ (अपघात नियंत्रण लिफ्ट) या उपयुक्त उपकरणाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला. लिफ्ट वापरताना होऊ शकणाऱ्या संभाव्य अपघातांना कसा प्रतिबंध करता येईल, यावर आधारित ही संकल्पना अत्यंत समाजोपयोगी असल्याने परीक्षकांनी या प्रकल्पाची विशेष दखल घेतली. हा प्रकल्प २६ जानेवारी रोजी जामखेड येथील नागेश्वर विद्यालयात होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात सादर केला जाणार आहे.
   या तालुकास्तरीय प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलकडून एकूण तीन गणित-विज्ञान उपकरणे सादर करण्यात आली होती.पहिली ते पाचवी गटात विद्यार्थी इनामदार आर्यन याने ‘मॅथेमॅटिकल पार्क’ (गणितीय उद्यान) ही अभिनव संकल्पना मांडली. खेळ व मनोरंजनाच्या माध्यमातून भूमिती, अंकगणित, मोजमाप, आकार ओळख अशा संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणारे हे उपकरण विशेष प्रशंसनीय ठरले.सहावी ते आठवी गटात विद्यार्थी शेख माहीन याने ‘बोलिक सोलर कुकर’ म्हणजेच सौर ऊर्जेवर चालणारी सौरचूल सादर करून पर्यावरणपूरक व ऊर्जा बचतीचा प्रभावी संदेश दिला.नववी ते बारावी गटात विद्यार्थी कुशारे समर्थ याने एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट सादर करून सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संशोधन मांडले. चित्रकला स्पर्धेत आदर्श मोरे, गौरव सोनवणे, अथर्व उगले, प्रतिष्ठा गारे, मुज्य मिल पठाण व ओंकार वाघ या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक चित्रे सादर केली. त्यांना कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
गणित-विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना परिवेक्षिका ज्योती शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, प्रतिभा बोरनार, गीतांजली खेमनार-शेख तसेच शाळेतील सर्व गणित-विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या दैदिप्यमान यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन झेब्रा आव्हाड, सचिव सौ. चैताली काळे तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेच्या व्यवस्थापनाचे मनापासून अभिनंदन केले.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई