गौतम पब्लिक स्कूल चा तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक
कोळपेवाडी प्रतिनिधी कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान गणित संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 53 नावे तालुकास्तरीय गणित व विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन दिनांक 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत कोपरगाव येथे केजी सोमय्या वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे पार पडले या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर गणित व विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची प्राचार्यांनुर शेख यांनीसांगितले
चित्रकला प्रदर्शनात सागर मोरे यांनी प्रदर्शित केलेल्या सोशल मीडियाच्या अतिवापर व त्याचे दुष्परिणाम होणारा सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रास प्रथम क्रमांक मिळाला आहे तसेच गणित व विज्ञान प्रदर्शनात समर्थ कुशारे यांच्या एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट या उपकरणाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांनी सांगितले की जानेवारी 26 मध्ये नागेश्वर विद्यालय जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनास गौतम पब्लिक स्कूलचे द्वितीय क्रमांक प्राप्त एक्सीडेंटल प्रेवेशन लिफ्ट उपक्रम सादर करण्यात येणार आहे या प्रदर्शनास चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे गटशिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यातील वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते
या तालुकास्तरीय प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूल कडून एकूण तीन गणित व विज्ञान उपकरणे सादर करण्यात आली होती पहिली ते पाचवी गटात विद्यार्थी इनामदार आर्यन याने मॅथेमॅटिकल पार्क( गणितीय उद्यान) हे अभिनव उपकरण सादर केले आहे या संकल्पनेत खेळ मनोरंजनाने प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मुलांना भूमिती अंकगणित मोजमाप आकार ओळख अशा विविध गणिती संकल्पना सहजरित्या समजावून देणारे उपकरण सादर केले आहे सहावी ते आठवी गटात विद्यार्थी शेख माहीन याने बोलिक सोलर कुकर म्हणजे सौर उर्जेवर चालणारी सौरचूल उपकरण सादर केले पर्यावरण पूरक व ऊर्जा बचतीचा संदेश देणारे हे उपकरण सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वयंपाक कसा करता येतो हे दाखवून दिले नववी ते बारावी गटात विद्यार्थी कुशारे समर्थ याने एक्सीडेंटल प्रेवेशन लिफ्ट( अपघात नियंत्रण लिफ्ट) हे अत्यंत उपयुक्त व समाज उपयोगी उपकरण सादर केले लिफ्ट वापरताना होणाऱ्या संभाव्य अपघातांना कसा प्रतिकार करता येईल यावर आधारित असल्याने परीक्षकांनी
या उपकरणाची विशेष दखल घेतली
या प्रदर्शनात चित्रकला स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा आदर्श मोरे गौरव सोनवणे अथर्व उगले प्रतिष्ठा गारे मुज्य मिल पठाण ओंकार वाघ या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक चित्रे सादर केली या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले गणित व विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना परिवेक्षिका ज्योति शेलार पर्यवेक्षक राजेंद्र आढाव प्रतिभा बोरनार गीतांजली खेमनार शेख तसेच शाळेतील सर्व गणित व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा आ अशोकराव काळे विश्वस्त आशुतोष काळे व्हा चेअरमन झेब्रा आव्हाड सचिव सौ चैताली काळे संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्य उपस्थित होते
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





