best news portal development company in india

त्र्यंबकेश्वरमध्ये वेडसर महिलेच्या खुनाचा जलद उलगडा…
🚨नाशिक ग्रामीण पोलिसांची तत्परता;🚨अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद…

SHARE:

प्रतिनिधी नाशिक

नाशिक: त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका वेडसर महिलेच्या खुनाच्या गंभीर घटनेचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण, नियोजनबद्ध व जलद तपास करत उल्लेखनीय उलगडा केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल संदीपपासून सुमारे 60 मीटर अंतरावर, नाशिक–त्र्यंबकेश्वर रोडलगत रस्त्याच्या कडेला एका अनोळखी वेडसर महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या डोक्यात दगडाने वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 196/2025, भा.दं.वि. कलम 103 (1) कायदा 2023 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. बालासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिसरदेलकर यांनी तात्काळ तपास यंत्रणा सक्रिय करत सर्व संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ श्री. वासुदेव डसले, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकांनी समन्वय साधत तपासाला गती दिली.
पोलीस पथकांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी करून मृतदेहावरील कपडे, वर्णन तसेच परिसरातील माहिती गोळा केली. गुप्त बातमीदारांचे प्रभावी जाळे वापरत पोलिसांनी अल्पावधीत मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचे नाव
चुक्काबाई सीताराम बाथ,वय 52, रा. ब्राह्मणवाडा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिकअसे असून ती त्र्यंबकेश्वर परिसरात भंगार गोळा करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले.
    त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या संपर्कातील व्यक्ती, भंगार गोळा करणारे मजूर व स्थानिक नागरिकांची सखोल चौकशी केली. या कसोशीच्या तपासातून पांडुरंग देवराम गोविंद भंगारे,वय 35, रा. सामुंडी, ता. त्र्यंबकेश्वर याच्यावर संशय केंद्रित करण्यात आला. आरोपी तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यास त्र्यंबकेश्वर तालुक्यातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले.
तांत्रिक व प्रत्यक्ष चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपी व मृत महिला दोघेही भंगार गोळा करून विक्री करत असून दोघांनाही दारूचे व्यसन होते. 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता, आरोपीने मृत महिलेजवळ गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने विरोध केला. त्या रागातून आरोपीने तिच्या डोक्यात दगडाने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास
पोलीस निरीक्षक श्री. महेश कुलकर्णी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे
हे प्रभावीपणे करत आहेत.
या खुनाचा उलगडा करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी समन्वय, तत्परता आणि व्यावसायिक कौशल्य दाखवत समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई