best news portal development company in india

सिन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार!
मानेगाव येथील कोंबड्यांच्या शेडवर हल्ला; 200 कोंबड्यांचा बळी, दोन लाखांचे नुकसान…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर

सिन्नर:दि. 26 डिसेंबर 2025 तालुक्यातील मानेगाव येथील सोनवणे वस्तीवर बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी सुखदेव गणपत सोनवणे यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये 25 डिसेंबरच्या मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास बिबट्याने अचानक घुसखोरी करत तब्बल जवळपास 200 कोंबड्यांचा बळी घेतला. या हल्ल्यात सोनवणे कुटुंबाचे दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


       सुखदेव सोनवणे यांनी शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. लोखंडी जाळीच्या तार कंपाउंडमध्ये सुरक्षित शेड उभारून त्यांनी सुमारे 200 कोंबड्या पाळल्या होत्या. मात्र बिबट्याने काटेरी झुडपांतून व उभ्या पिकांचा आडोसा घेत दबा धरत कोंबड्यांच्या आवाजाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. शेडजवळ येताच त्याने जमिनीखालून खोदकाम करत जाळी उचकटून आत प्रवेश केला.
     शेडमध्ये घुसल्यानंतर बिबट्याने एकामागून एक कोंबड्यांवर हल्ला चढवला. कोंबडीचा केवळ रक्त पिऊन पुढील कोंबडीवर झडप घालण्याची क्रूर पद्धत वापरत त्याने काही वेळातच संपूर्ण शेड उद्ध्वस्त केली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली.
     या घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून संबंधित खात्याला माहिती दिली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही बसवण्यात आलेला नाही, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. त्यामुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून याआधीही अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी, पशुधन व पक्ष्यांचा बळी गेला आहे. काही ठिकाणी मानवी जीवितालाही धोका निर्माण झाल्याने “याला जबाबदार कोण?” असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
    दरम्यान, झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी तसेच परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसवण्यात यावा, अशी ठाम मागणी सुखदेव सोनवणे यांनी शासनाकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई