प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोळपेवाडी:साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (पुणे) यांच्या वतीने गाळप हंगाम 2024–25 साठी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने मध्य विभागातून तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार पटकावला आहे. साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उच्च कार्यक्षमतेचे सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखान्यांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेऊन विविध पुरस्कार प्रदान केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर 2024–25 च्या गाळप हंगामात उल्लेखनीय व सुधारित कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची मध्य विभागातून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे, 2023–24 च्या गाळप हंगामात या कारखान्याला मध्य विभागातून तांत्रिक कार्यक्षमता द्वितीय पुरस्कार मिळाला होता. मागील वर्षीच्या कामगिरीतील त्रुटींवर मात करत, अधिक काटेकोर नियोजन, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर व कार्यक्षम व्यवस्थापनामुळे यंदा कारखान्याने थेट प्रथम क्रमांकावर झेप घेतली असून कारखान्याने गाठलेली उल्लेखनीय तांत्रिक कामगिरी मिलमधील ऊस तंतुमय निर्देशांक : 86.6%
,रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME) : 96.16%,प्रायमरी एक्स्ट्रॅक्शन : 73.9%,बगॅस बचत : 8.77%,गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ : 8.12%,बगॅसमधील साखर व्यर्थतेचे प्रमाण : 0.52%,यांत्रिक व विद्युत गाळबंद काळ : 0.0%,पाण्याचा वापर (फायबर बेसिस) : 261.99,साखर उतारा : 11.20%
या सर्व बाबींची दखल घेत 2024–25 च्या गाळप हंगामासाठी मध्य विभागातून तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.
हा मानाचा पुरस्कार सोमवार, दिनांक 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास,ज्येष्ठ नेते शरद पवार,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पुरस्कारामुळे सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, सहकार क्षेत्रातील कारखान्यांसाठी तो एक आदर्श ठरणार आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





