best news portal development company in india

महाराष्ट्र कबड्डी चळवळीला नवे बळ!
राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची निवड…

SHARE:


प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोळपेवाडी:महाराष्ट्रातील कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, अमेचर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र स्वागत होत आहे.
    महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ही राज्यातील कबड्डी खेळाचे नियंत्रण, संचालन आणि विकास करणारी प्रमुख संस्था आहे. राज्यभर कबड्डीचा प्रचार-प्रसार करणे, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. मराठी मातीतील कबड्डी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ही संस्था प्रो कबड्डी लीग व भारतीय कबड्डी महासंघासोबत समन्वय साधत कार्यरत आहे.
   राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धांचे आयोजन, खेळाडू निवड प्रक्रिया, राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघाची निवड, तसेच पंच व प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन अशी बहुआयामी जबाबदारी ही संस्था नियमितपणे पार पाडत असते.
सन 2025 ते 2019 (नवीन कार्यकाळ) या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली आहे. याच कार्यकाळात उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची नियुक्ती झाल्याने कबड्डी चळवळीला न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सहकार, संघटन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले विवेक कोल्हे यांची दूरदृष्टी, नियोजन क्षमता आणि नेतृत्वगुण यांचा लाभ आता कबड्डी क्षेत्राला होणार आहे. हरियाणा नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धात्मक संधी आणि भक्कम संघटनात्मक पाठबळ देण्यासाठी ठोस धोरणे राबवली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, विवेक कोल्हे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील कबड्डीचा प्रवास अधिक गतिमान होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई