best news portal development company in india

ठाकरे बंधू एकत्र! महापालिका रणांगणात शिवसेना–मनसेची ऐतिहासिक युती; भाजपला मोठा धक्का…

SHARE:


  मुंबईसह पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय; मराठी मतांची एकी निर्णायक ठरणार


नाशिक / सिन्नर प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र,सिन्नर

सिन्नर:दि. 24 डिसेंबर 2025 उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या युतीमुळे विशेषतः भाजपसाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दीर्घकाळानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांची एकी साधली जाणार असून, त्याचा थेट फायदा महापालिका निवडणुकांमध्ये युतीला होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार असून, युतीच्या निर्णयामुळे राज्यभरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकांसाठी जागावाटपाचा तिढा सोडवण्यात आला असून, मुंबई महापालिकेत शिवसेनेला 157 जागा, मनसेला 70 जागा, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा देण्यावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वय अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे.
युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,“मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील जनतेला जे हवे आहे, तेच आम्ही करणार आहोत.”तर राज ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले,“महाराष्ट्राच्या हितापुढे काहीच मोठं नाही. राज्याच्या भविष्यासाठी हा निर्णय आवश्यक होता.”
ठाकरे बंधूंच्या या ऐक्यामुळे विशेषतः मुंबई व नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. मराठी मतांचे विभाजन टळल्यास युतीला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.
एकूणच, ठाकरे बंधूंची ही युती केवळ निवडणूकपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र 
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई