प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास राज्यस्तरीय ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित सहकार मंत्री परिषदेत राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, अशी माहिती कारखान्याच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संजीवनी साखर कारखान्याचे संचालक रमेश आभाळे, ज्ञानदेव अवताडे तसेच व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला..
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथील सहकार भवनात आयोजित परिषदेत सहकार मंत्री नामदार बाबासाहेब देशमुख यांनी सहकार चळवळीसमोरील भविष्यातील आव्हाने, सहकार तत्त्वांचा प्रसार, व्यवसायिक पद्धतीने पारदर्शक कारभार, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास या विषयांवर मार्गदर्शन करत विकासमंथन केले. याच कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सहकार आयुक्त दीपक तावरे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, अॅड. प्रल्हाद कोकरे, गौतम ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्यासह राज्यातील विविध सहकारी संस्था, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशातील पहिला बायो-सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युलर खत निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे लोकार्पित करून सहकार क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले होते. उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने साखर उत्पादनासोबतच विविध रासायनिक उपपदार्थ निर्मिती व औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे.
हरित तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपक्रम, पारदर्शक कारभार आणि शाश्वत विकासाचा आदर्श ठेवत कारखान्याने मिळवलेला हा पुरस्कार सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





