प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
“एवन न्यूज महाराष्ट्र“
सिन्नर: दि. २३ डिसेंबर २०२५ नांदूर शिंगोटे येथे श्री रेणुका माता मंदिर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या निमित्ताने ग्रामीण क्रीडासंस्कृतीला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच नांदूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार डॉ. विलास भाऊ पांगरकर यांच्या वतीने आयोजित कुस्ती व बैलगाडा शर्यतींमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

काल आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी ₹११,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला पंचक्रोशीतील मल्लांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुस्तीच्या आखाड्यात प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

आज रेणुका माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत विजयी ठरलेल्या गाडा मालकांना प्रत्येकी एक सायकल याप्रमाणे एकूण १० सायकली बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यासोबतच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या विविध साहित्याचेही वाटप करण्यात आले.या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील खेळाडू, शेतकरी आणि युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. पारंपरिक खेळ जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच ग्रामीण क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी, बैलगाडा शर्यतीचे आयोजक, छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विलास भाऊ पांगरकर यांनी भविष्यातही अशा सामाजिक, क्रीडा व शेतकरी हिताच्या उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.


Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





