best news portal development company in india

   पदांसाठी शिवसेना बंडखोरांना पाच वर्षांचा पाठिंबा देण्याची तयारी
आमदार आशुतोष काळेंची राजकीय ‘गुगली’; कोपरगावच्या सत्तासमीकरणांकडे शहराचे लक्ष…

SHARE:

प्रतिनिधी : निवृत्ती पगार, कोळपेवाडी

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, उपनगराध्यक्ष व विषय समित्यांच्या पदांसाठी शिवसेना बंडखोरांना गरज भासल्यास पाचही वर्षे पाठिंबा देऊ, अशी स्पष्ट भूमिका आमदार आशुतोष काळे यांनी मांडली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही ‘राजकीय गुगली’ टाकण्यात आल्याने आता शिवसेना व अपक्ष नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये भाजपच्या कोल्हे गटाने १९ जागा मिळवत बाजी मारली असून, आमदार आशुतोष काळे गटाला ११ जागा, शिवसेनेला ४ जागा, तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे. सत्ताधारी गटाकडे संख्याबळ असले तरी शिवसेना व अपक्षांकडे निर्णायक वाटाघाटीची ताकद आल्याने आगामी पदवाटपासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर आज आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार, राज्यपाल संस्था अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष सुनील गुंगले, माजी गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, धरमचंद बागरेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, “आपण आणलेला निधी आधी जाहीर करून मगच खर्च केला जाईल, यासाठी आमचे नगरसेवक दक्ष राहतील. सन २०१६ नंतर ही निवडणूक विशेष महत्त्वाची होती. त्या वेळी आमचे सात नगरसेवक होते, आता त्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तीन उमेदवार थोडक्यात पराभूत झाले असून नगराध्यक्षपदाचा उमेदवारही अल्प फरकाने पराभूत झाला आहे.“सत्ताधारी गटाकडे १९ नगरसेवक असले तरी त्यामध्ये शिवसेना व अपक्ष आहेत. मागील वेळी विकासाच्या मुद्द्यावर माजी नगराध्यक्ष विजय वाढणे यांना आम्ही पाठिंबा दिला होता. यापुढेही गरज भासल्यास विकासासाठी पाठिंबा देऊ. अन्यथा आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करू.” यामुळे सत्तेचा समतोल राखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ओमप्रकाश काका कोयटे यांनी निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना सांगितले की, “पराभव हा पराभवच असतो, मात्र कोल्हे गटाची ४० वर्षांची सत्ता असूनही एकूण मतदानात त्यांना केवळ ४८ टक्के मते मिळाली आहेत. उर्वरित ५२ टक्के मते विरोधकांच्या बाजूने आहेत.”
    त्यांनी तिसऱ्या प्रभागात गुंडगिरी व धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप करत कोल्हे कुटुंबावर गंभीर आरोप केले. तसेच विकासकामात अडथळे आणणार नसून, चांगल्या कामांना पाठिंबा दिला जाईल, असेही स्पष्ट केले.
     समता संस्थेबाबत झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना कोयटे म्हणाले की, “थकबाकीदारांवर कारवाई ठेवीदारांच्या हितासाठी केली जाते. ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठी विमा संरक्षण दिले असून पुढील काळात ठेवीदारांच्या हिताचे काम सुरूच राहील.”पत्रकार परिषदेत शेवटी बोलताना कोयटे यांनी स्पष्ट केले की, “राजकारणाला समाजकारणाची जोड देत पुढील काळात अधिक ताकदीने काम करणार आहे.”
एकूणच, कोपरगाव नगरपरिषदेत पदवाटप, पाठिंबा आणि विरोधाच्या राजकारणामुळे येणारे दिवस चांगलेच तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,
“एवन न्यूज महाराष्ट्र”
,कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई