प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान शिल्पकार, भारतीय शिल्पकलेचे ज्येष्ठ साधक पद्मभूषण रामजी सुतार (दादा) यांच्या निधनाने भारतीय कला विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक कलाकार नव्हे, तर शिल्पकलेचा तपस्वी, इतिहास आणि संस्कृती जिवंत करणारा ऋषिप्रतिम साधक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राम सुतार यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित कलायात्रेत भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर नेले. राष्ट्रभावना, इतिहास आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या त्यांच्या अजरामर कलाकृतींमुळे भारताची ओळख जगभर पोहोचली. नर्मदा नदीच्या तीरावर उभारलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचे भव्य स्मारक, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच वारकरी संप्रदायाचे शिल्प या त्यांच्या कलाकृती भारतीय अस्मितेचे प्रतीक ठरल्या आहेत.
मंत्री विखे पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “राम सुतार यांनी जिवंत शिल्पकलेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये जगासमोर मांडली. त्यांच्या शिल्पांमध्ये अचूक अभिव्यक्ती, सूक्ष्म भावदर्शकता आणि भव्यतेचा सुंदर समतोल दिसतो. भारतीय कला परंपरेला आधुनिकतेची जोड देणारे ते द्रष्टे कलाकार होते.”
१०१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करून शिल्पकलेची परंपरा पुढे नेली. शेवटच्या श्वासापर्यंत शिल्पकलेसाठी समर्पित राहिलेल्या राम सुतार यांना केंद्र सरकारने पद्मभूषण, तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
“उभी राहणारी आणि उभी राहिलेली प्रत्येक शिल्पकृती दादा, तुमचे अस्तित्व सांगत राहील…” अशा भावपूर्ण शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा देत मंत्री विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या प्रवासातील एक महान साधक काळाच्या पडद्याआड गेला असून, मात्र त्यांनी घडवलेली शिल्पे पिढ्यान्पिढ्या त्यांचे अस्तित्व जिवंत ठेवतील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





