best news portal development company in india

ऐतिहासिक विजयाची नोंद!
येवला नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा; राजेंद्र भाऊ लोणारी 1100 मतांनी दणदणीत विजयी

SHARE:

    ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक

येवला | प्रतिनिधी:येवला नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ऐतिहासिक विजयाची नोंद करत शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र भाऊ लोणारी यांनी तब्बल 1100 मतांच्या भक्कम आघाडीने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

या विजयामुळे येवला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच शहरातील विविध भागात फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष, ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

येवला शहरातील जनतेने दाखवलेला हा स्पष्ट कौल नेतृत्वावरचा, विकासावरचा आणि प्रामाणिक कामावरचा विश्वास असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मागील कार्यकाळात शहर विकासासाठी राबवलेली कामे, सामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विश्वासार्ह नेतृत्व याचा फायदा राजेंद्र भाऊ लोणारी यांना झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना मा. श्री. राजेंद्र भाऊ लोणारी म्हणाले की,“हा विजय केवळ माझा नसून, येवला शहरातील प्रत्येक नागरिकाचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवीन. येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे.”हा विजय एखाद्या व्यक्तीचा नसून,
विकासाचा, सक्षम नेतृत्वाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे स्पष्ट होत आहे.
    या ऐतिहासिक विजयाबद्दल येवला शहरातील नागरिकांचे, मतदारांचे, कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. हा

ज्ञानेश्वर सांगळे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
नाशिक
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई