best news portal development company in india

कोपरगाव नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा..!
हाय व्होल्टेज लढतीत पराग संधान विजयी; 409 मतांनी राष्ट्रवादीचा पराभव

SHARE:



प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी दि. 21 डिसेंबर

निवृत्ती पगार,कोळपेवाडी:::कोपरगाव नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व हाय व्होल्टेज ठरलेल्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेत आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार पराग संधान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश काका कोयते यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव केला.
     मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराग संधान यांना 18,503 मते मिळाली, तर ओमप्रकाश काका कोयते यांना 18,094 मते प्राप्त झाली. अत्यंत चुरशीची व निसटती ठरलेली ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरली.
    नगरपरिषदेसाठी 15 प्रभागांतील 29 जागांसाठी मतदान झाले होते. अनेक प्रभागांमध्ये भाजप आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली.
   निकाल जाहीर होताच कोपरगाव शहरातील विविध भागांत भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला. फटाके फोडून, गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अनेक प्रभागांतील विजयामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई