best news portal development company in india

   सदनिका घोटाळा प्रकरण: मंत्री माणिकराव कोकाटेंचे अटक वॉरंट जारी; पोलीस मुंबईकडे रवाना.अजित पवार गटाला मोठा धक्का! खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याप्रकरणी कोकाटेंना कारावासाची शिक्षा…

SHARE:


नाशिक / सिन्नर

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे सिन्नर
     सिन्नर:राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. नाशिकमधील सिन्नरचे आमदार आणि राज्याचे विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री कोट्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे खोटे कागदपत्रे सादर करून सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटे यांची दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट जारी झाले असून त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहे.
    सुमारे ३० वर्षांपूर्वीचा हा वाद आहे. सिन्नरचे तत्कालीन आमदार तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी आपण गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा खोटा दाखला सादर केला होता. या आधारे त्यांनी शासनाची फसवणूक करून मुख्यमंत्री कोट्यातून तब्बल चार सदनिका लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी कायदेशीर लढा सुरू असताना नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी आपला निकाल दिला, ज्यामध्ये कोकाटे यांना दोषी धरत दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे सध्या ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, ते प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
         सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली, तर त्याचे सदस्यत्व (आमदारकी) आपोआप रद्द होऊ शकते. या संकटामुळे महायुती सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोकाटे यांची कारकीर्द वादांनी वेढलेली राहिली आहे. यापूर्वी अधिवेशनादरम्यान सभागृहात बसून रमी खेळत असल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांचे कृषीमंत्री पद काढून त्यांना क्रीडामंत्री करण्यात आले होते. मात्र, आता थेट तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने कोकाटे यांच्यासमोर मोठे घटनात्मक संकट उभे राहिले आहे.
तुकाराम दिघोळे यांची कन्या अ‍ॅड. राठोड यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा लढा लढत होतो. गरिबांच्या हक्काचे घर लाटणाऱ्यांना अखेर शिक्षा झाली, याचे समाधान आहे. आम्ही आता या प्रकरणी उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माणिकराव कोकाटे यांना अटक टाळण्यासाठी तातडीने उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. जर उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, तरच त्यांचे आमदारकीचे पद वाचू शकते. अन्यथा, सिन्नर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई