best news portal development company in india

कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत; कुंभारी शिवारात शेतकऱ्यावर हल्ला, नागरिक आक्रमक…

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

अहिल्यानगर:कोपरगाव तालुक्यातील कुंभारी-माहेगाव देशमुख शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, सोमवारी संध्याकाळी एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दामू नामदेव मोरे (वय ४९) हे गंभीर जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    कोपरगाव तालुक्यातील कुंभारी शिवारातील ‘काळे वस्ती’जवळ १५ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दामू मोरे हे आपल्या कामात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. मोरे यांनी प्रतिकार केल्याने बिबट्या पसार झाला, मात्र या झटापटीत ते जखमी झाले.
   घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने हालचाली करत मोरे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
    येसगाव परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता कुंभारी भागात झालेल्या या हल्ल्यामुळे कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सततचे दर्शन आणि वाढते हल्ले यामुळे शेतकरी वर्गात मोठे भीतीचे सावट आहे.बिबट्याची दहशत खूपच वाढली आहे. शेतात जाणे आता असुरक्षित झाले असून, वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी जखमी दामू मोरे यांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
या घटनेमुळे कुंभारी आणि परिसरातील ग्रामस्थ अत्यंत संतप्त झाले आहेत. वन विभागाने केवळ पंचनामे न करता, परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.जर वन विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष दिले नाही आणि बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर संपूर्ण तालुक्यातील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,”एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई