प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर (प्रतिनिधी): तालुक्यातील पाथरे येथील चिनी वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी रात्री बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, परिसरात अद्यापही इतर बिबट्यांचा वावर असल्याचा संशय असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

पाथरे परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. उसाचे दाट क्षेत्र बिबट्यांसाठी सुरक्षित लपण्याचे ठिकाण ठरत असल्याने या भागात बिबट्यांचा वावर वाढला होता. रात्रीच्या वेळी बिबट्या मानवी वस्तीजवळ येत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे कठीण झाले होते. या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
शेतकरी हेमंत चिले यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. सोमवारी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या कारवाईत वनपाल तानाजी भुजबळ, झाकीर सय्यद, आकाश रूपवते, रोहित लोणारे, निखिल वैद्य, नारायण वैद्य आणि जगत जाधव यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षणासाठी मोहदरी उद्यान येथे हलवण्यात आले आहे.
बिबट्या पकडला गेला असला तरी ग्रामस्थांची धास्ती कमी झालेली नाही. “बिबट्यांची हिंमत वाढली असून गावागावात दहशत पसरली आहे. आता गाव सोडून जावे की काय, अशी मनस्थिती झाली आहे,” अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.”

सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





