प्रतिनिधी: निवृत्ती पगार,कोळपेवाडी
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत, हा मार्ग मूळ प्रस्तावाप्रमाणे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव आणि चाकण मार्गेच करण्यात यावा, अशी ठाम मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या महत्त्वपूर्ण भेटीवेळी खासदार वाकचौरे यांच्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे उपस्थित होते. नाशिक आणि पुणे या दोन मोठ्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांना जोडणारा हा मार्ग थेट असणे गरजेचे असून, तो वळवल्यास प्रकल्पाचा मूळ उद्देश सफल होणार नाही, असा सूर या नेत्यांनी लावून धरला आहे.
रेल्वे मार्ग बदलल्याच्या निषेधार्थ आणि मूळ प्रस्तावाप्रमाणे रेल्वे अकोले तालुक्यातूनच जावी, या मागणीसाठी मंगळवारी अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून पुकारलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आले आहेत.
अकोले येथून संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.५ वर्षांपूर्वीच्या प्रस्तावात अकोले तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित होते, ते कायम ठेवण्यात यावे.
जी.एम.आर.टी. (GMRT) संवेदनशील क्षेत्राचे कारण देत रेल्वेचा मार्ग बदलला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, खासदार वाकचौरे यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, केवळ तांत्रिक कारणास्तव मोठा लोकसमूह रेल्वे सुविधेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. शहापूर-शिर्डी-अकोले असा रेल्वे मार्ग व्हावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक-पुणे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी वळसा न घालता थेट मार्ग हवा. सिन्नर, संगमनेर, अकोले आणि चाकण ही पट्टा औद्योगिकदृष्ट्या विकसित असल्याने रेल्वेचा फायदा येथील उद्योगांना होईल.अकोले तालुक्यातील जनतेने आंदोलनाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला असून, आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, आता या प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





