best news portal development company in india

‘आठ दिवसांत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन!’ अरणगाव-वाळकी रस्त्यासाठी महाविकास आघाडीचा PWD ला इशारा…

SHARE:

प्रतिनिधी अहिल्यानगर 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):,अहिल्यानगर जिल्ह्यातील अरणगाव ते वाळकी या महत्त्वपूर्ण रस्त्याची झालेली दुरवस्था आणि या रस्त्यावरील वारंवार होणाऱ्या अपघातांना कंटाळून स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालयास एक आक्रमक निवेदन सादर केले. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्याची दुरुस्ती येत्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
      अरणगाव ते वाळकी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. “निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अपघातांसाठी थेट PWD च्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली.


         सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करताना महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण म्हस्के यांचा समावेश होता.
त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, भारत बोडखे, महेंद्र शेळके, चंदुकाका पवार, गणेश तोडमल, आणि राहुल बहिरट आदी मान्यवरही या आंदोलनात्मक भूमिकेत सहभागी झाले होते.
      पदाधिकाऱ्यांनी PWD ला स्पष्ट शब्दांत सांगितले की, जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करून ते तातडीने पूर्ण करावे. जर बांधकाम विभागाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
     या इशाऱ्यामुळे आता PWD चे अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे अरणगाव आणि वाळकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई