best news portal development company in india

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात..
कार उलटून दोन जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी जखमींमध्ये सात लहान मुलांचा समावेश,लग्न समारंभासाठी निघालेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
नाशिक प्रतिनिधी सिन्नर:नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात उत्तरा जवळ गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला. मुंबई–कल्याण परिसरातील रहिवासी असलेल्या वराडे कुटुंबाच्या कारचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जण १३ वर्षांखालील लहान मुले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सदर कुटुंब हे सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आयोजित लग्न समारंभासाठी जात असताना हा अपघात झाला. लग्नासाठी दोन बसेस व काही छोट्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लग्नस्थळ अवघ्या काही अंतरावर असतानाच कारचा भीषण अपघात झाल्याने आनंदावर दुःखाचे सावट पसरले.

प्राथमिक तपासानुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या उजव्या बाजूचा संरक्षक अडथळा तोडला. त्यानंतर वाहन दोन्ही मार्गिकांमधील मधल्या चरात (चारीत) पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की वाहनातील काही जणांना गंभीर दुखापत झाली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या एक महिला व एक पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून
एका जखमीचा सिन्नर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.तर दुसऱ्या जखमीचा नाशिक येथील रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
      अपघातानंतर जखमींना तातडीने सिन्नर येथील परमसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांचे पथक विशेष लक्ष ठेवून आहे.मृतकांची नावे:बाजीराव गांगुर्डे,निशा गडगुळ (वय २०)
यांचा मृत्यू झालेला असून परमेश्वर गडगुळ (वय २१),मीनाबाई गडगुळ (वय ४६) जखमी असून इतर जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
   या घटनेची नोंद वावी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
   विशेष म्हणजे, याच समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारातही एक खासगी वाहन उलटून दोन जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्या अपघातातील मृतक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करवड येथील रहिवासी होते.
        सलग घडणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी वेगमर्यादा व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई