प्रतिनिधी:किसन सोनवणे”एवन न्यूज महाराष्ट्र”
कारवाडी, अहिल्यानगर
अहमदनगर (कारवाडी): कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील आदिवासी समाजाच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी-येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील सुमारे १०० आदिवासी बांधवांचे जीवन अक्षरशः खडतर झाले आहे. शासनाने घरे बांधून दिली असली तरी, मूलभूत सुविधा असलेला ‘रस्ता’ नसल्याने विद्यार्थी, वृद्ध आणि विशेषतः आजारी व्यक्तींसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या हांडेवाडी येथील समस्येची दाहकता नुकतीच समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वस्तीतील एक महिला गंभीररीत्या आजारी पडल्या. मात्र, रस्ताच नसल्यामुळे रुग्णवाहिका व गाडी घरापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेरीस, सदर महिलेला उचलून, पायवाटेने दूरवर असलेल्या गाडीपर्यंत नेऊन, त्यानंतरच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करता आले. दैनंदिन जीवनात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत असून, रस्ता नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणातही अडथळे येत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ अवताडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोपरगावचे माननीय तहसीलदार यांच्या भेटीला गेले आणि त्यांच्यासमोर ही समस्या मांडली.
यावेळी, आदिवासी संघटनेने तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे एक निवेदन तहसीलदारांना सादर केले होते.या वेळी संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ अवताडे,जिल्हाध्यक्ष किसनराव सोनवणे, पदाधिकारी नवनाथ सोनवणे, साईनाथ सोनवणे, दादासाहेब सोनवणे, वाल्मीक पवार तसेच, हांडेवाडी येथील अनेक समाज बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्यासमोर आपली व्यथा स्पष्टपणे मांडली आणि रस्ते नसल्यामुळे होणारे हाल कथन केले. यावेळी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अन्यथा न्याय न मिळाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल,’ अशा तीव्र भावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.
आदिवासी बांधवांच्या समस्या आणि भावना ऐकल्यानंतर माननीय तहसीलदार यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी शिष्टमंडळाला ‘या प्रकरणावर लवकरच लक्ष घालून, तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल,’ अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे.
हांडेवाडी येथील आदिवासी बांधवांना आता प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीची प्रतीक्षा असून, लवकरच त्यांच्या जाण्या-येण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





