प्रतिनिधी नाशिक
प्रतिनिधी नाशिक: १२ डिसेंबर २०२५:नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या लाचखोरी प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत एका लाचखोर लिपिकाला रंगेहाथ पकडले आहे. लोकसेवक राजेंद्र पांडुरंग मोरवडे, वय- ५२ वर्षे, पद- कनिष्ठ लिपिक (टंचाई निधी कार्यालय, दोंदी ग्रामीन पाणी योजना बांधकाम विभाग, नाशिक), याच्याविरुद्ध शासकीय कर्तव्यपूर्तीसाठी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत, एका दिव्यांग व्यक्तीची ‘स्नॅकची हातगाडी’ जप्त करण्यात आली होती. ही गाडी परत सोडण्यासाठी एका प्रशासकीय सेवकाने (Administrative Employee) रु. ९,०००/- ची मागणी केली. परंतु दिव्यांग व्यक्तीची 9000 देण्याची परिस्थिती नसल्याने तडजोडीअंती रु. ७,०००/- देण्याचे ठरले यानंतर दिव्यांग बांधवाने या भ्रष्टाचाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB – Anti-Corruption Bureau) केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि प्रशासकीय सेवकास रु. ७,०००/- स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
राजेंद्र पांडुरंग मोरवडे, वय- ५२ वर्षे. (कनिष्ठ लिपिक, टंचाई निधी कार्यालय, दोंदी ग्रामीन पाणी योजना बांधकाम विभाग, नाशिक).
तक्रारदाराणे या प्रकरणी लाचखोरी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. आरोपी राजेंद्र पांडुरंग मोरवडे वय- ५२ वर्षे. (कनिष्ठ लिपिक, टंचाई निधी कार्यालय, दोंदी ग्रामीन पाणी योजना बांधकाम विभाग, नाशिक).यांच्यावर ११/१२/२०२५ रोजी कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला.
आरोपी लोकसेवक राजेंद्र मोरवडे याने तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या स्वखर्चाने खरेदी केलेल्या हातगाडी अधिग्रहणाचे पेमेंट मंजूर करणे आणि हातगाडी खरेदीच्या बिलाची संपूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी तसेच भविष्यात टंचाई निधी कार्यालयाशी संबंधित कोणत्याही शासकीय कामात सहकार्य मिळवण्याकरिता लाचेची मागणी केली होती.सुरवातीला त्याने एकूण ९,०००/- रुपयांची लाच मागितली होती. परंतु, तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचखोरी प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.
लाच मागणीची पडताळणी झाल्यानंतर, ११/१२/२०२५ रोजी सापळा रचण्यात आला. या सापळ्यादरम्यान आरोपी राजेंद्र मोरवडे याने तक्रारदाराकडून ७,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच, लाचखोरी प्रतिबंधक विभागाने त्याला तातडीने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई उपायुक्त/पोलीस निरीक्षक श्रीमती मेघा सुनील सुवर्णकर, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी लाचखोरी प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणतेही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी त्वरित लाचखोरी प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क पत्ता:
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
ईमेल: spcnasik@mahapolice.gov.in
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





