:::::ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक
नाशिक/मखमलाबाद: महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्षयोद्धा, बहुजनांचे नेते आणि ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत भाजप नेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती आज, १२ डिसेंबर रोजी, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, मखमलाबाद येथे अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. मुंडे साहेबांच्या लोककल्याणकारी विचारांना आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाला विनम्र अभिवादन करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला व्ही एन संस्थेचे विश्वस्त दामोदर आण्णा मानकर, संस्थेचे संचालक प्रल्हाद आप्पा काकड, संचालक गोकुळ काकड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद पालवे, विद्यार्थी सुरक्षा समिती अध्यक्ष शरद काकड, तसेच संजय गामणे, प्रताप काकड, मिलिंद मानकर, विक्रम कडाळे, मिलिंद मानकर, योगेश पिंगळे यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी साहेबांच्या कार्याला व स्मृतींना आदरांजली वाहिली.यावेळी मान्यवरांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी तसेच गरीब जनतेसाठी केलेल्या अविस्मरणीय कार्यावर प्रबोधन केले. मुंडे साहेबांनी ग्रामीण भागातील तरुणांना राजकारणात संधी दिली आणि संघर्ष करूनही यशाच्या शिखरावर पोहोचता येते, हे त्यांच्या जीवनातून सिद्ध केले. त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.साहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, मुंडे साहेबांचे कार्य आणि विचार आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले.

यावेळी सेंट्रल गोदावरी संस्थेचे चेअरमन अनिल काकड यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाने कार्यक्रमाला आणखी उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरण लाभले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “साहेबांच्या विचारांवर चालताना…” हा संकल्प करत, उपस्थितांनी महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला आदराने वंदन केले.
कार्यक्रमाचा समारोप जय गोपीनाथ! जय महाराष्ट्र! च्या जयघोषात करण्यात आला.

नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





