प्रतिनिधी:प्रकाश शिंदे,कोपरगाव
कोपरगाव | प्रतिनिधी:कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या कथित बेकायदेशीर व्यापारी संकुलाचा वाद आता पेटला असून, या विरोधात प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते किशोर आसाराम मिसाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल न घेतल्याने येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाबाहेर ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे.
दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर ३१० आणि ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १२३५ या जागेवर ग्रामपंचायतीने नियमबाह्य पद्धतीने व्यापारी गाळे (दुकाने) बांधल्याचा आरोप किशोर मिसाळ यांनी केला आहे. हे गाळे केवळ बांधलेच नाहीत, तर ते बेकायदेशीररित्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हे बांधकाम त्वरित पाडून जागा मोकळी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

या गंभीर प्रकरणी किशोर मिसाळ यांनी आजवर प्रशासनाच्या सर्व स्तरांवर दाद मागितली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, अहिल्यानगर), जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), अप्पर जिल्हाधिकारी (शिर्डी), उपविभागीय अधिकारी (शिर्डी), गटविकास अधिकारी (कोपरगाव), तहसीलदार (कोपरगाव) तसेच तालुका पोलीस स्टेशन यांना सविस्तर निवेदने दिली आहेत.
मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडून या निवेदनांची कोणतीही गंभीर दखल घेतली गेली नाही. स्थानिक पातळीवर अनेकदा आंदोलने करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने आणि कारवाई टाळली जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने आता हे प्रकरण राज्याच्या उपराजधानीत पोहोचणार आहे. गुरुवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनाबाहेर ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात येणार आहे. जोपर्यंत हे बेकायदेशीर गाळे पाडण्याचे आदेश पारित होत नाहीत आणि जागा मोकळी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा, तसेच आमरण लढा देण्याचा निर्धार किशोर मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
“गावातील शासकीय जागेवर ग्रामपंचायतीनेच अतिक्रमण करून बेकायदेशीर गाळे उभारणे हे गंभीर आहे. आम्ही वारंवार पुराव्यासह तक्रारी केल्या, पण अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत. आता आमचा संयम संपला आहे. त्यामुळेच लोकशाही मार्गाने नागपूर अधिवेशनात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणार आहे. जोपर्यंत गाळे पडत नाहीत, तोपर्यंत माघार नाही.”
– किशोर आसाराम मिसाळ (सामाजिक कार्यकर्ते, दहेगाव बोलका)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





