best news portal development company in india

आनंदाची बातमी: नाशिककरांचे स्वप्न होणार साकार; नाशिक-मुंबई थेट लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा!

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
नाशिक/सिन्नर:नाशिकहून मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. आता मुंबई प्रवासासाठी केवळ ठराविक एक्स्प्रेस गाड्यांवर किंवा ‘पंचवटी’सारख्या स्पेशल ट्रेनवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे नाशिक-मुंबई ‘लोकल’सेवेचा मार्ग प्रशस्त झाला आहे..
   हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई या मार्गावर दोन नवीन रेल्वे लाईन्स (तिसरी आणि चौथी मार्गिका) उभारण्यास मंजुरी दिली आहे. या नवीन रेल्वे मार्गांमुळे नाशिककरांना थेट फायदा होणार आहे. या निर्णयामुळे आता नाशिकहून थेट मुंबईसाठी लोकल किंवा मेमू (MEMU) शटल सेवा सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
   नाशिक-मुंबई लोकल सुरू करण्यामध्ये कसारा घाटातील तांत्रिक अडचणी हा सर्वात मोठा अडथळा होता. मात्र, संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तांत्रिक अडचणींवर तोडगा निघाला आहे. घाटातील अडचण दूर झाल्याने आता नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रेनच्या वेळापत्रकासाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
   या नवीन प्रकल्पामुळे केवळ वाहतूकच वेगवान होणार नाही, तर कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे.या मार्गावर
पाडळी,वैतारणानगर,चिंचलेखैरे या तीन ठिकाणी नवीन रेल्वे स्थानके उभारली जाणार आहे.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या प्रकल्पासाठी संसद दरबारी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आता यश आले आहे. हा प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सध्या नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी मर्यादित गाड्या आहेत. त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र, नवीन लाईन्स आणि संभाव्य लोकल सेवेमुळे हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे. नाशिकच्या विकासाला या निर्णयामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे,”एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई