प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, एवन न्यूज महाराष्ट्र, सिन्नर


सिन्नर: सिन्नर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या नायब तहसीलदाराला तब्बल अडीच लाख रुपये (₹ २,५०,०००/-) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
सिन्नर तालुक्यातील महसूल विभागाचे नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर (वय ५१) यांना एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. दोडी येथील एका तक्रारदाराच्या मुलाच्या आणि सूनेच्या नावावरील गट नंबर ४९९, मौजे दोडी खुर्द, तालुका सिन्नर येथील जमिनीच्या ‘फेरफार नोंद क्रमांक ३३४५’ मंजूर करण्यासाठी नायब तहसीलदार धनगर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला दहा लाख रुपयांची (₹ १०,००,०००/-) मागणी केली होती.

तडजोडीनंतर हा सौदा अखेर अडीच लाख रुपयांवर निश्चित झाला. नायब तहसीलदाराने ९ डिसेंबर रोजी सोपान हॉस्पिटलसमोर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरवले. याच माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने अत्यंत योजनाबद्धरीत्या सापळा रचला.
तक्रारदाराकडून पंचांसमक्ष अडीच लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना नायब तहसीलदार संजय धनगर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५३ / २०२५ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच, सापळा (ट्रॅप) आणि पुढील शोधमोहिम (सर्च ऑपरेशन) यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार प्रमोद पाळदे, संदीप वनवे, शरद हेंबाडे आणि युवराज खांडवी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
या कारवाईमुळे सिन्नरच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे आणि शासनाच्या कोणत्याही विभागात भ्रष्टाचाराला थारा नाही, असा संदेश पुन्हा एकदा एसीबीने दिला आहे.

सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





