प्रतिनिधी :भाऊसाहेब हंडोरे,”एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
सिन्नर: सिन्नर तालुक्यातील शिर्डी-सिन्नर महामार्गावर असलेल्या मिरगाव फाट्याजवळील सिद्धिविनायक देवस्थानाला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. येथील गणेश मूर्तीच्या चांदीच्या मुकुटासह सुमारे २८ भार वजनाचा ऐवज, तसेच पितळी वस्तू आणि दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात चोरट्यांची दहशत वाढली असून, ग्रामस्थांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (सोमवार) सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी राजेंद्र पावले हे नित्य विधीसाठी मंदिरात गेले असता, त्यांना मंदिरातील चांदीच्या गणपतीचा २८ भार वजनाचा मुकुट, पितळी समई, दोन पादुका, १५ किलो वजनाचा पितळी धातूचा कळस तसेच दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

तात्काळ त्यांनी गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली. भाविकांची कायम मोठी गर्दी असलेल्या या मंदिरात रात्रीच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मागील केवळ दहा दिवसांपूर्वीच या मंदिरात सिद्धिविनायक गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आणि मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला होता.

या घटनेनंतर परिसरात चोरट्यांचे प्रमाण वाढले असून, गावोगावी त्यांची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांची मागणी: “पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. गस्त घालताना सायरन वाजवत फिरल्याने चोरटे सावध होतात आणि गाडी निघून गेल्यावर पुन्हा चोरीसाठी बाहेर पडतात. चोरट्यांना पकडण्यासाठी विनाकारण सायरन न वाजवता शांतपणे पाळत ठेवून त्यांना पकडणे गरजेचे आहे. परंतु, केवळ कामगिरी दाखवण्यासाठी पोलीस सायरन वाजवत गस्त दाखवून देण्याचे काम करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
चोरीच्या या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस खात्याकडून अधिक प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे असल्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या चोरीप्रकरणी वावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





