best news portal development company in india

तपोवनातील वृक्षतोडीवर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक; गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री व्हावे- दत्ताभाऊ बोडके यांची मागणी!

SHARE:

प्रतिनिधी :नाशिक”ए वन न्यूज महाराष्ट्र


    नाशिक:येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोडके यांनी तपोवनात प्रस्तावित असलेल्या एक्झिबिशन सेंटरसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला असून, प्रशासनाच्या निर्णयावर गंभीर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे मत व्यक्त केले.
तपोवन वृक्षतोडी संदर्भातील निर्णयावर टीका करत सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोडके यांनी सरकारचा आणि प्रशासनाचा तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगितले.
तपोवन वृक्षतोडी संदर्भात मंत्र्यांनी दिले आश्वासन त्यांनी नमूद केले की कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांवर तसा शब्द दिलेला आहे, की वृक्षतोड होणार नाही.
या वेळी श्री बोडके यांनी सांगितले की आयुक्तांनी सरकारला तसेच नाशिककर जनतेला अंधारात ठेवून एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणला, टेंडर फ्लॅश केले आणि झाडे तोडण्याचा घाट घातला. सरकार आणि आयुक्त प्रशासनाला येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असून. तपोवनातील झाडे तोडता कामा नयेत, उलट १५ लाख झाडे लावली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे महत्त्व देत निसर्गाचा ऱ्हास झाल्यास त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो, हे सरकारने आणि प्रशासनाने समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


   या वेळी गिरीश महाजन यांना दत्ताभाऊ बोडके यांनी मंत्री गिरीश महाजन यांना एक सूचना आणि विनंती केली आहे. महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देऊन नाशिक शहरातून पोटनिवडणूक लढवावी आणि जर नाशिककरांनी त्यांना विजयी केले, तर त्यांनी पुन्हा मंत्रिपद स्वीकारावे.
  ते पुढे म्हणाले की, जर भविष्यात देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये गेले, तर गिरीश महाजन यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. जर ते नाशिक शहरातून निवडून येऊन मुख्यमंत्री झाले, तर स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत नाशिकला मिळालेले नसलेले मुख्यमंत्रिपद नाशिककरांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई