प्रतिनिधी नाशिक”ए वन न्यूज महाराष्ट्र“
नाशिक: सप्तशृंगी गड येथे दर्शनासाठी गेलेल्या पिंपळगाव बसवंत येथील एकाच कुटुंबातील आणि परिसरातील सहा जणांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना आज (7.12.2025) घडली. प्रसिद्ध उद्योजक आणि पटेल कुटुंबातील हे सदस्य प्रवास करत असलेले वाहन खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला, ज्यात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपळगाव बसवंत गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत (तालुका निफाड) येथील रहिवासी असलेले पटेल कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे सहकारी आज सकाळी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचे वाहन (क्रमांक: MH-15 BN 0555) परत येत असताना,सप्तशृंगी गडाच्या घाटात चालकाचेनियंत्रण सुटून खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत दुर्दैवाने ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कीर्ती पटेल,रसीला पटेल,विठ्ठल पटेल,लता पटेल, पचन पटेल,मणिबेन पटेल मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून, मृतदेहांची ओळख पटविण्याचे आणि त्यांना दरीतून बाहेर काढण्याचे कार्य स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तत्काळ सुरू केले. पिंपळगाव बसवंत शोकात बुडाले असून
पटेल कुटुंबीय हे पिंपळगाव बसवंत येथील प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. या घटनेमुळे पिंपळगाव बसवंत शहरात आणि पंचक्रोशीत तीव्र दुःख व्यक्त होत आहे. गावातील आपलेच सहा लोक अपघातात गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समस्त पिंपळगाव बसवंतकरांच्या वतीने या सर्व दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भगवान श्री सप्तशृंगी माता मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या अपरिमित दुःखातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





