प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सन २०२५-२६ च्या ऊस तोडणी हंगामासाठी आलेल्या सर्व ऊसतोड कामगारांसाठी ‘उन्नती’ शिबिराअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तपासणी झालेल्या कामगारांना आवश्यक गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बोरणारे यांनी दिली.

ऊसतोड कामगार हे साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचे तसेच उद्योग समूहाचे एक महत्त्वाचे घटक आहेत. ऊस तोडणीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे ऊसतोड कामगारांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. ही गंभीर बाब लक्षात घेऊनच या आरोग्य शिबिराचे प्रयोजन करण्यात आले आहे, असे कार्यकारी संचालक बोरणारे यांनी सांगितले.
ज्या कामगारांची भरती हंगामी मुकादमातर्फे होते, जे कामगार ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या भागातून एकत्र येतात, जे ऊस तोडणी, मळणी, मुळी बांधून ट्रॅक्टर/ट्रक मध्ये भरणी करतात व बैलगाडीने वाहतूक करतात आणि ज्यांचे कारखान्यावर थेट जबाबदारी नसते, अशा कामगारांना ‘ऊसतोड कामगार’ संबोधले जाते. यांच्या व त्यांच्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर असल्याने त्यांच्यासाठी अशा आरोग्य सेवा पुरवणे आवश्यक असते.
कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या वसाहतीमध्ये या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या ‘उन्नती’ मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे, सचिव बाबासाहेब, सहसचिव संदीप शिरसाठ, शेती अधिकारी निळकंठ शिंदे, आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हरतवाल यांच्यासह डॉ. शैलेंद्र कुमार जैन, डॉ. सागर रहाणे, डॉ. गणेश गावडे, डॉ. सोनाली मुरादे, शुभम देशमुख, अमोल गायकवाड, अर्चना कांबळे, खुशाल बनसोडे, वैभव सोळशे, कृष्णा जराड, सीमाधीनक, शितल मस्के आणि सुरेगाव उपकेंद्राअंतर्गत सर्व आशासेविका उपस्थित होत्या.
या आरोग्य शिबिरामुळे हजारो कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





