best news portal development company in india

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूल सज्ज!🏑🏑🏑

SHARE:


कोळपेवाडी प्रतिनिधी: निवृत्ती पगार

“ए वन न्यूज महाराष्ट्र
  अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने बहुप्रतिक्षित राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा दिनांक ६ ते ७ डिसेंबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात आली असून, गौतम पब्लिक स्कूल संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आठ विभागांतील मुला-मुलींचे असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. याप्रसंगी पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर कुरुंगे आणि क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक वितरण संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

   सदर स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, सिलेक्शन कमिटी, सहभागी संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, सर्व संघांतील खेळाडू आणि पंच उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त, सिलेक्शन ट्रायलसाठी (निवड चाचणी) शंभरहून अधिक खेळाडू उपस्थित राहणार आहेत. सहभागी संघातील सर्व खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांच्या जेवणाची तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई