प्रतिनिधी:किसन सोनवणे,कारवाडी
कारवाडी (कोपरगाव तालुका): कोपरगाव तालुक्यातील कारवाडी ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) समाजाची बांधिलकी जपण्यासाठी कारवाडी ग्रामपंचायत व समाज मंदिर या दोन्ही ठिकाणी एका उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी मान्यवरांची उपस्थिती हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते किसनराव सोनवणे, प्रकाशराव शिंदे, आणि बाळासाहेब घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असुन प्रमुख पाहुणे म्हणून मानव विकास परिषदेचे अध्यक्ष मोतीराम भाऊ निकम उपस्थित होते.

त्यांच्यासोबतच सरपंच मंगेश लोकरे, सचिन शिरसागर, दिलीप बनकर, शंकरराव फटांगरे, अशोक वाघ, अनिल खरे, साईनाथ कोकाटे, चांगदेव गांगुडे, नानासाहेब दुशिंग, एकनाथ घेगडमल, आणि भाऊसाहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व साहित्य वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष मोतीराम भाऊ निकम यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख उद्दिष्ट: महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देणे आणि शिक्षण तसेच सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूल, कारवाडी येथील सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारवाडी ग्रामपंचायत आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





