प्रतिनिधी:”एवन न्यूज महाराष्ट्र”नाशिक

नाशिक: रेड स्वस्तिक सोसायटी (Red Swastik Society) नाशिक शाखेच्या वतीने रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी चांदगिरी, तालुका व जिल्हा नाशिक येथे एका भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि चांदगिरी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा तब्बल ६५० रुग्णांनी लाभ घेतला.

संयुक्त विद्यमाने आयोजन सदर आरोग्य शिबिर सहवास हॉस्पिटलचे डॉ. ब्रह्मा नाईक व त्यांची टीम, तिरुपती हॉस्पिटलचे डॉ. संकेत पाटील व त्यांची टीम, तसेच डॉ. मोहित कांचन व डॉ. किरण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडले. या सर्व डॉक्टरांनी व त्यांच्या टीमने रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक व प्रमुख अतिथी
हे शिबिर श्री. टी.एस. भाल साहेब आणि अशोक शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सदर आरोग्य शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून श्री. सोपान कासार हे उपस्थित होते, तर शिबिराचे अध्यक्षस्थान जे. बी. पाटील यांनी भूषवले.

याप्रसंगी सर्वश्री मिलिंद खानोरे, प्रभाकर रायते, विलास सोनवणे, सतीश घोलप, अर्जुन बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, चांदगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कटाळे, पोलीस पाटील लखन कटाळे, सदस्य किरण कटाळे, रामहरी कटाळे, अनिता कृष्णा बागुल, विद्या अनिल शेलार, प्रियंका कटाळे, संतोष कटाळे, आणि युवराज कटाळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
रेड स्वस्तिक सोसायटीच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे चांदगिरी व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, सोसायटीच्या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





