best news portal development company in india

खासदार भगरे सरांनी घेतली नैताळे येथील श्री मतोबा देवस्थानला भेट; मूर्ती चोरीबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा, लवकरच तपास लागेल असे आश्वासन!

SHARE:

प्रतिनिधी:नानासाहेब सांगळे,नाशिक
निफाड, नाशिक: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नैताळे (Naitale) येथील श्री मतोबा महाराज (Shree Matoba Maharaj) मंदिरातून ३ डिसेंबर रोजी दोन चांदीच्या मूर्तींची चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी आज देवस्थानला भेट दिली. त्यांनी या घटनेबद्दल देवस्थानचे विश्वस्त नवनाथ पाटील बोरगुडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
      या चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष पसरला आहे. नैताळे गाव आणि परिसरातील भाविकांची भावना तीव्र असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सातत्याने देवस्थानला भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत आहेत.
    खासदार भगरे यांनी यावेळी मूर्ती चोरीच्या संवेदनशील प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांशी (SP) तात्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली. पोलीस यंत्रणा योग्य दिशेने तपास करत असल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “पोलीस या प्रकरणाचा तपास दोन दिवसांत लावून चोरांना पकडतील आणि मूर्ती परत आणतील.”
यावेळी पोलीस पाटील आत्माराम बोरगुडे, गायरान बचाव समितीचे रतन बोरगुडे, दिलीप घायाळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गणेश कापसे, सदाशिव कोटकर, रवींद्र बोरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. खा. भगरे सरांनी केलेल्या आश्वासनामुळे नैताळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

श्री.ज्ञानेश्वर सांगळे,एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई