प्रतिनिधी:महेश साळुंके,लासलगाव
लासलगाव:निफाड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध परिसरात गस्त घालत वाहने तपासली. यावेळी खडी व मातीची अवैधरित्या वाहतूक करणारी चार वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत खनिज वाहतूकदारांना खबरदारीचा इशारा मिळाला आहे.

या वेळी कारवाईदरम्यान हस्तगत करण्यात आलेली वहाने
चेतन भंडारी – एम् एच १५ जे डब्लू २७८७ (हाफ बॉडी डंपर)
खडीची अवैध वाहतूक करताना आढळले. वाहन जप्त करून ₹१.१८ लाखांचा दंड आकारण्यात आला.
बाळासाहेब चौधरी – चेसी नंबर MAT448832K3G18722 (हायवा)
मातीची परवानगी नसलेली वाहतूक करताना तपासणीदरम्यान उघड आल्याने या वाहनावर ₹२.३० लाख दंड ठोठावण्यात आला.
नीरज चोरडिया – एम् एच १५ के जे ९३३९ (हाफ बॉडी डंपर)
खडी वाहतूक करणारे हे वाहन परवानगीविना असल्याचे ही आढळले आहे. या वाहनावरही ₹१.१८ लाख दंड आकारण्यात आला.
अब्बास सय्यद – एम् एच ०५ ४३२२ (हाफ बॉडी डंपर)
अवैध खनिज वाहतूक प्रकरणात ताब्यात घेऊन ₹१.१८ लाख दंड लावण्यात आला.
तहसीलदारांच्या पथकाने या कारवाईदरम्यान वाहतुकीची कागदपत्रे, रॉयल्टी पावत्या, परवाने आणि मालाचा तपशील यांची तपासणी केली. नियमबाह्य वाहतूक आढळल्याने संबंधित सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली. महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खनिज वाहतूक प्रकरणांवर नियंत्रण मिळवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अवैधरित्या खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, पण पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
कारवाईत झालेल्या सहभागी पथका मध्यें विशाल नाईकवाडे,तहसीलदार, निफाड,जयंत लिलके,मंडळ अधिकारी,ज्ञानेश्वर केसरे मंडळ अधिकारी,अश्विनी भोसले मंडळ अधिकारी,अमोल चव्हाण तलाठी,राहुल अहिरे तलाठी,दीपक पवार तलाठी,राहुल भांगरे तलाठी
आदींचा समावेश आहे.महसूल विभागाने पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहीमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तालुक्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसून नियमांचे पालन करूनच खनिज वाहतूक करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे...
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





