best news portal development company in india

75 हजार 300 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त…नायलॉन मांजा विक्री, उत्पादन आणि वापरावर बंदी असतानाही शहरात छुप्या पद्धतीने विक्री.कडक कारवाई करण्याचे आदेश…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

    सिन्नर: सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे नायलॉन मांजामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 4 डिसेंबर 2025 रोजी घडली. नायलॉन मांजामुळे होणार्‍या अपघातांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

   सिन्नर नगर परिषद प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत 75 हजार 300 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. नायलॉन मांजा विक्री, उत्पादन आणि वापरावर बंदी असतानाही शहरात छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे.


    मागील आठवड्यात सिन्नर येथील कानडी मळावी येथील युवकाचा मोटरसायकलीवर जात असताना कान्होगाला चिरून गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सर्व घटना घडल्याने मांजा विक्रेत्यावर कार्यवाहीचा फक्त बघा दिसून येत असून तोच अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही अशी या घटनेवरून निदर्शनास येत आहे..
   गुरुवारी दुपारी मुसळगाव परिसरात ग्रामपंचायतीची वसुली करीत असताना कर्मचारी शिवशंकर खामकर व विकी पोपट जाधव. यांना नायलॉन मांजा मुळे गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना मुसळगाव फाट्यावर घडली असून  जखमीच्या नाक. भुवयी.मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत..

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई