पत्रकार: नाना सांगळे,नाशिक
नासिक:पतीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात महिला पोलीस अंमलदाराने पत्नी आणि तिच्या मित्राकडे २० हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीने सापळा रचून कारवाई करत महिलेला रंगेहाथ पकडलं
छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार लता बाळासाहेब दराडे हिला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गारखेडा येथील तिच्या घरात रंगेहाथ पकडले.
कारवाई न करण्यासाठी लता दराडेने तरुणी आणि तिच्या मित्राकडे प्रत्येकी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. दोघांनी एसीबीकडे तक्रार केली असता सापळा रचून महिला पोलिसाला अटक करण्यात आली.एसीबीची राहत्या घरात कारवाई केली.

संभाजीनगर येथे २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही कारवाई झाली. दौलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३७ वर्षीय लता दराडेला एमरॉल्ड सिटी येथील राहत्या घरातच पकडण्यात आले.
कशासाठी मागितली लाच
दौलताबाद परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला पत्नीवर संशय होता. यावरुन दोघांचे वाद सुरु होते. तरुणाने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास महिला पोलीस अंमलदार लता दराडे हिच्याकडे आला होता.
महिला आणि मित्राची एसीबीकडे तक्रार
लता दराडेने २५ नोव्हेंबर रोजी महिला आणि तिच्या मित्राला पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्यासाठी दोघांकडे प्रत्येकी १० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे संतप्त झालेला महिला आणि तिच्या मित्राने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली.फोन करुन घरी बोलावलं मी एसीबीने लाचेच्या मागणीची खात्री केल्यानंतर सापळा रचला. महिला आणि तिच्या मित्राने लता दराडेला फोन केला असता तिने आधी त्यांना पोलीस ठाण्यातच बोलावलं. मात्र उशीर झाल्याने ती घरी निघून गेली. महिलेच्या मित्राने पुन्हा फोन केल्यावर लता दराडेने दोघांना आपल्या घरी येण्यास सांगितलं
केसात हात फिरवत इशारा
संध्याकाळी एसीबी पथकाने तिच्या घराबाहेर सापळा रचला. महिला आणि तिच्या मित्राने लता दराडेच्या घरी जाऊन तिला २० हजार रुपये दिले. लताने लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदार महिलेने केसात हात फिरवत पोलिसांना इशारा केला. त्याचवेळी दोन मिनिटातत एसीबी पथकाने धाव घेऊन लता दराडेला ताब्यात घेतलं.व लता दराडे रंगेहाथ सापडली.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, संगिता पाटील, सुरेश नाईकनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांनी ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दीपक इंगळे, सचिन बारसे, रामेश्वर गोरे, सी. एन. बागूल यांचा समावेश होता.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





