प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”,सिन्नर
सिन्नर. दि : 29 नोव्हेंबर – सध्या स्थानिक स्वराज पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्यामध्ये स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे लक्षात येत आहे.या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार दरम्यान महाराष्ट्रातील बहुतेक तालुक्यात प्रचारसभा घेत असताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर कुठल्याही बाबींचा विचार न करता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी तालुका दत्तक घेण्याचे आश्वासन द्यायचा जो सपाटा लावला आहे,त्यावर माणिकराव कोकाटे यांनी जोरदार आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राज्यातील प्रत्येक तालुका ही दत्तक घेऊ शकत नाही असा दावा केला आहे. या संदर्भात कोकाटे यांनी निवडणुका या जनसंपर्क आणि विकासाच्या मुद्यावर लावल्या जातात याचा विचार करून पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांना लक्षात आणून द्यावे. विनाकारण आपापल्या पक्षात दरी निर्माण होईल असे वक्तव्य टाळावे,जेनेकरून पक्षातील सलोखा कायम राहील.
मागील काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी असून ते आता एकमेकांच्या गिळण्याच्या प्रयत्नात आहे याचाच करते या निवडणुकीत येत असल्याची दिसत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे यावेळी मात्र म्हणतात विचारपूर्वक मतदान करणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असे आहे. महायुतीच्या उमेदवार या निवडणुकीत मोठ्या मत संख्येने निवडुन आणावे. व शक्य तिथे युतीचे उमेदवार निवडून आणावे अशी आशा मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





