best news portal development company in india

नाशिक महानगरपालिका कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त पदावरून त्वरित बदली करणे बाबत….

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्यूज महाराष्ट्र,नाशिक

श्री.दत्ताभाऊ बोडके,
प्रहार जनशक्ती पक्ष संपर्कप्रमुख
नाशिक



  नाशिक: सद्यस्थितीत नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे कार्यरत असलेले आयुक्त शेखर सिंह यांची शासनाने थेट नवीन पद निर्मिती करून सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत.परंतु    श्री.शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयुक्तपदी असताना नियमबाह्य कामे, महानगरपालिकेच्या ठेवी मोडणे, अतिरिक्त कर्ज घेणे,अशा प्रकारची कामे केलेले असल्याचे समजते. त्यांची तक्रार महाराष्ट्र राज्याचे नगर विकास विभागाकडे आली आहे.या अनुषंगाने नगर विकास विभागाने पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त असताना कामकाजाची चौकशी करून अहवाल मागितलेला आहे.

   जर त्यांनी पिंपरी’-चिंचवड येथे नियमबाह्यपणे काम केले असेल, तर नाशिक येथे होणारा कुंभमेळा आणि या कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या हजारो कोटीचा निधीची कामे करतांना नियमबाह्य खर्च होऊ शकतो,कामकाज नियमबाह्य होऊ शकते. याबाबत निवेदनही दिलेले आहे.

      तरी या अनुषंगाने नगर विकास विभागाच्या तक्रारीच्यानुसार आपण शेखर सिंह यांची त्वरित बदली करावी आणि कुंभमेळा प्राधिकरणचे विभागीय आयुक्त श्री.प्रवीण गेडाम साहेब यांच्याकडेच सर्व कुंभमेळ्याची नियोजनाची-कामकाजाची जबाबदारी असू द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई