best news portal development company in india

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा…. उत्तम मोकळे यांचे महाराष्ट्र पर्यावरण रक्षक म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती — !

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”

सिन्नर
       सिन्नर/ दि : 23 नोव्हेंबर– पर्यावरण व आरोग्य विषयक समाज जागृती व कृत्रिम प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आर टी आय जागता संघटना यांच्यामार्फत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर च्या कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने  नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात एक मानाचे स्थान मिळाल्याने श्री मोकळ यांनी नाशिक जिल्ह्याची मान उंचावली आहे.श्री मोकळे हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता व न्याय हक्कासाठी झगडत आहे.

    सिन्नर तालुक्यातील पर्यावरण संबंधित अनेक प्रश्न व त्यांना  वाचा फोडत असताना सिन्नर व नगर हद्दीत च्या सीमेवर असलेल्या कोळपेवाडी येथील कर्मवीर सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना व डिसलरी विभागामार्फत मळयुक्त पाण्याचा परिसरात होणारा वापर व त्या अनुषंगाने भूगर्भीय परकुलेशन झाल्याने परिसरातील शेती नापीक होण्याची भीती व्यक्त होत असताना मोकळ यांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे.परंतु प्रस्थापित व धनदांडग्या राजकीय दबावापुढे संबंधित सरकारी अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या व मोकळ यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रश्न दाबून ठेवत गेले परंतु मोकळ यांनी हार न मानता व दबावापुढे न झुकता कुठल्याही तडजोडी ला बळी न पडता सतत संघर्ष करीत राहिले. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन पर्यावरणाविषयी व कारखान्याच्या मळीयुक्त पाण्या विषयी आपली बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवला. या संदर्भात न्यायालयाने संबंधित कारखान्याला चाळीस लाखाचा दंड भरण्याचा आदेश दिला असून यापुढे मुळेयुक्त पाणी या परिसर सोडली जाणार नाही याची जबाबदारी घेण्याचे हमीदिली आहे .

       अशा अनेक प्रश्न व सातत्याने आवाज उठवणारे मोकळे यांना प्रदूषण नियंत्रण तथा आर टि आय आयोग या विभागामार्फत पर्यावरण रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री मोकळ यांच्या पर्यावरण व सामाजिक कार्याविषयी सातत्य व नियमित्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आर टी आय संघटना भारत संस्थापक अध्यक्ष संदेश कुमार भाटी ( पर्यावरण  विभाग ) यांच्यामार्फत अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई