best news portal development company in india

सिंहस्थ कुंभमेळा; साधूग्रामसाठी अनेक वृक्षांवर चालणार कुऱ्हाड,नाशिकचे वृक्षप्रेमी आक्रमक…. वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थिनीचा वृक्षारोपण करून पर्यावरण सुरक्षेचा संदेश….

SHARE:

प्रतिनिधी:योगिता हिरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”

नाशिक

    नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात 40 टक्के वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे,नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 2027 मधे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या अनुषंगाने नाशिकच्या तपोवन परिसरात बाराशे एकर जागेवर साधूग्राम साकारण्यात येणार आहे. याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेच्या 54 एकरवरील 1670 वृक्षांवर पिवळ्या रंगाची फुली मारली असून त्यापैकी 40 टक्के वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण सोहळ्याने अधिकृतरित्या कुंभमेळ्यास सुरुवात होईल. त्यानंतर देशभरातून साधू महंतांचे आगमन होईल.
        एकीकडे कुंभमेळ्यासाठी सरकार झाडांच्या कत्तली करत असताना नाशकातील मखमलाबाद व्ही.एन.नाईक या शाळेतील  एका चिमुकली ने आपल्या वाढदिवशी ५० झाडांच वृक्षारोपण करत. वृक्षसंवर्धनाचा संदेश देत एक आदर्श निर्माण केला आहे.कार्तीकी ज्ञानेश्वर सांगळे ह्या 11 वर्षीय चिमुकलीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व्हि.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या मखमलाबाद येथील विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला.  या छानशा उपक्रमामुळे कार्तिकी ज्ञानेश्वर सांगळे यांचा सर्वत्र कौतुक केले जात आहे..

      यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख दत्ताभाऊ  बोडके धात्रक सर शाम गोसावी सर ए वन न्यूज चे संपादक श्री अरुण गायकवाड सर उपसंपादक ज्ञानेश्वर सांगळे सर सर्व  व्ही एन नाईक शालेय शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी,विद्यार्थी व मखमलाबाद ग्रामस्थ उपस्थित होते….

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई