प्रतिनिधी :प्रकाश शिंदे “ए वन न्यूज महाराष्ट्र”कोपरगाव
अहिल्यानगर: जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील शंकराव काळे सहकारी साखर कारखाना चालू झालेला असून या कारखान्याच्या ऊस वाहतूक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी तसेच जाणारे येणारे दुचाकी वाहन धारकांच्या डोळ्यात तसेच श्वासोच्छवासाला त्रास होत असल्याने सदर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने दखल घेऊन धूळ नियंत्रणात आणावी असे सामान्य नागरिक मागणी करत आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या ऊस वाहतूक साधनांच्या येण्या जाण्याने मोठ्या प्रमाणात धूळ उठत असून ही धूळ परिसरातील नागरिकांच्या नाकारतोंडात जाऊन श्वासोच्छवासाचे तसेच फुफ्फुसाचे व डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असल्याने यावर लवकरात लवकर समक्ष पाहणी करून उपाययोजना करावी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी व उपाययोजना करावी. तसेच पाणी मारून तात्काळ उपाययोजना करावी.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ, किशोर मिसाळ, किसन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मौलाना अफजल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला व धुळे नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी केली.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





