प्रतिनिधी देऊळगावराजा
:::: तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून खुलेआम अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. संबंधित प्रशासनाला याची संपूर्ण माहिती असूनही केवळ रेती माफिया हे प्रत्येक वेळी साम दाम दंड भेद याचा वापर करत असल्याच्या भीतीपोटी ओरड झाल्यानंतर थातूरमातूर कारवाई होताना दिसून येत आहे. दिनांक ९ नोव्हेंबर २५ रोजी महसूल च्या पथकाने तालुक्यातील मेव्हणा राजा शिवारात रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर पकडले. त्यापैकी दोन टिप्पर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले तर टिप्पर क्रमांक (एमएच २८ बीवाय ५९७९) हा पळून जाण्याच्या नादात एका खड्ड्यांमध्ये फसला त्यानंतर त्या ठिकाणी महसूल व पोलीस पथक तैनात करण्यात आले. दरम्यान दोन जेसीबीच्या साह्याने पथका समोर टिप्पर बाहेर काढले व टिप्पर चालकाने थेट मेहेकर कडे धूम ठोकली. सिनेस्टाईल झालेल्या या प्रकारामुळे संबंधित यंत्रणा प्रमुखांमध्ये घबराहट पुढली कारवाई आता काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सुमित आनंदा जाधव ग्राम महसूल अधिकारी यांनी रितसर तक्रार देऊळगाव राजा पोलिस स्टेशन ला दाखल केली आहे. मात्र याच दिवशी पकडण्यात आलेल्या इतर दोन टिप्पर चालक व मालक यांचे विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ३६ तासानंतर पूर्ण झालेली नव्हती.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गत महिन्यापूर्वी बुलडाणा येथील भेटीमध्ये सर्व यंत्रणा प्रमुखांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत खडक पूर्ण प्रकल्पातून अवैद्य रेती उपसा व वाहतूकचा प्रत्र चर्चेला गेला त्याचवेळी त्यांनी त्याबाबत सक्त आदेश दिले होते की, महसूल प्रशासन पोलीस प्रशासन परिवहन अधिकारी तसेच जलसंपदा विभागाने संयुक्त कार्यवाही करून रेती माफिया विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, त्यांच्या आदेशानंतर संबंधित यत्रना प्रमुखांनी वेळोवेळी बातुर-मातुर कारवाई केली आणि याबाबत सविस्तर असे की, राज्याचे रेती माफियाचे यामुळे मनोबल वाढले ……
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





