प्रतिनिधी:नाना सांगळे,नाशिक

तालुक्यातील सारस्ते गावातील वादग्रस्त विहीर खोलीकरण प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे दोन पत्रे देऊनही चौकशीसाठी आवश्यक असलेली मूळ फाईल उपलब्ध न झाल्याने हा घोटाळा अधिकच गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून १६ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, परंतु एक महिना उलटूनही चौकशी तर झाली नाहीच, उलट फाईलच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून प्रशासनातील निष्क्रियतेविरोधात आणि ठेकेदाराला वाचवण्याच्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थ व तक्रारदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण छेडले जाईल असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
सारस्ते गावातील सार्वजनिक विहीर खोलीकरण आणि नूतनीकरणाचे काम ठेकेदार शुभम माळेकर यांना देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषद भवन नाशिक
कोणतेही काम न करता, माळेकरने ग्रामसेवक आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे आणि खोटे अहवाल तयार केल्याचे उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे उपअभियंता राठोड यांनी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्याहूनही गंभीर प्रकार म्हणजे ग्रामसेवकांनी त्या बनावट विहिरीचा ताबा घेतल्याचे दाखवले, आणि कार्यकारी अभियंत्यांनी ५ टक्के पाहणी दाखवून अंतिम बिल मंजुरीचा प्रस्ताव तयार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) त्र्यंबक तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता संपूर्ण बनावट कारस्थानाचा भांडाफोड झाला. गावात प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नसताना कागदोपत्री विहीर पूर्ण दाखवण्यात आली होती. या नंतर ठेकेदार माळेकरने चौकशीपासून वाचण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून मूळ फाईलच गायब केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशा नंतर देखील एक महिन्यानंतर ना फाईल मिळाली, ना अहवाल तयार झाला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप तारडे यांनी “फाईल मिळाल्याशिवाय चौकशी शक्य नाही असे सांगत या प्रकरणाचा पेच वाढवला आहे. त्यांनी लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठेकेदार शुभम माळेकर हा एका प्रभावशाली राजकीय पदाधिकाऱ्याचा नातलग असल्यानेच त्याला वाचवण्यासाठी विभागीय पातळीवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.
चौकशीमध्ये जाणूनबुजून विलंब करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. या घोटाळ्याची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करून संबंधित ठेकेदार, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





