प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी साक्षी ऋषिकेश विघ्ने, विघनवाडी ता.सिन्नर हिला सर्पदंश झाला.उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात उपचार सुरू करण्यासाठी देवपूर व सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस (Anti-Snake Venom Serum) उपलब्ध नसल्याने रुग्णाला नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
या प्रवासादरम्यान रुग्णाचे प्राण धोक्यात येतात. संबंधित अधिकारी श्री मोहन बच्छाव यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही.सदर घटना ही अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रमिक क्रांती-गरिबांचा आवाज अरुण रामचंद्र पांगरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अर्ज केला आहे. या अर्जामध्ये विविध मागण्या केलेल्या आहे.सर्पदंशावरील लस प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी.अशा आणीबाणीच्या प्रसंगी जबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देणे बंधनकारक करावे.संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.अशी विनंती करण्यात आली आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





