best news portal development company in india

सामाजिक ऐक्य व एकात्मतेचं घडवलं दर्शन…. मुस्लिम बांधवाकडून दिवाळीनिमित्त सिन्नर करांना लाखोंच्या भेटवस्तू व प्रत्येक सभासदांना पैठणीचे वाटप….

SHARE:

      पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे, एवन न्यूज महाराष्ट्र, सिन्नर

सिन्नर : सामाजिक ऐक्य व बांधिलकी कायम ठेवत कोळगाव माळी येथील मुस्लिम समाजाचे पिरसाई दूध संकलन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शाकीर भाई शेख यांनी गेल्या सात वर्षापासून दूध संकलन सुरू केले.त्या संकलनाची घोडदौड मोठ्या दिमाखात सुरू असुन मागील वर्षी जवळपास तीन लाखापर्यंत बक्षीसाची वाटप केली होती. तसेच याही वर्षी 2025 रोजी ती परंपरा कायम राखत शाकीर भाई यांनी लकी ड्रॉ पद्धत ठेवली होती. 

          यावेळी  दोन सभासदांसाठी लकी ड्रॉ काढला असून त्यात पहिले बक्षीस होंडा कंपनीची मोटरसायकल संदीप रामभाऊ कदम यांना लागले, तर दुसरे बक्षीस सुरेश मच्छिंद्र गायकवाड यांना इलेक्ट्रिक मोटरसायकल ही लागली आहे .  हे दोन्ही सभासद हया बक्षीसाचे मानकरी ठरले आहे.तर तिसरे बक्षीस प्रमोद धामणे यांना( फ्रिज,)  संदीप गुलाब शेख यांना ( पिठाची गिरणी .) सौ.नंदिनी जुंधारे ( मोबाईल . ) किरण सोमनाथ भोकर  (रबरी मॅट ) गणेश गणपत वाबळे( कुलर) आणि लक्ष्मण मोकळ ( मिक्सर ) बालम मिया पटेल क्राफ्ट . जावेद भैय्या पटेल ( इलेक्ट्रिक शेगडी ) गणेश शिंदे ( दोन खुर्च्या )आणि बाराव बक्षीस लकी ड्रॉ पद्धतीने काढून इरफान चॉंद शेख यांना मिल्किंग मशिन मिळाले आहे. तर इतर सर्व सभासदांना प्रतेकी एक पैठणी साडी चे दिवाळी भेट म्हणून  वाटप करण्यात आले… 


            यावेळी पिरसाई दूध केंद्राचे संचालक शाकीर भाई शेख यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना एक नव्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे., पुढील पाच वर्षे जो दुध उत्पादक एक नंबर क्वालिटीचे व सर्वात जास्त दूध घालणाऱ्या सभासदांना संस्थेच्या 11 व्या वर्धापनदिनी चार चाकी कार देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे… वरील बक्षीस हे लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले केली आहे.

    या कार्यक्रमाला माजी सरपंच अंबादास कदम. वाल्मीक झुंजारे .बंडू कुमावत . मा. सरपंच उत्तम मोकळ. सर्जेराव चंदे .बाळासाहेब कदम. गुलाब पटेल. अल्ताफ पटेल. धामणे साहेब. माणिक चंद्रे. बबलू शेख . दिलीप चंद्र आदी मान्यवर  उपस्थित होते .प्रास्ताविक मागील सरपंच  उत्तम मोकळ यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन शाखीव भाई यांनी मानले आहे . 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई