best news portal development company in india

स्व:खर्च करून अनिल भाऊ सरवार यांनी भागवली सिन्नर करांची तहाण…..

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

———————————————————————-

  सिन्नर: सर्वत्र पाऊस संपून थोडेच दिवस झाले तरीही सिन्नर तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून,सध्या सिन्नर शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत असल्याने आईन दिवाळीत अनिल भाऊ सरवार यांनी स्व:खर्चाने करून पिण्याच्या पाण्याचे टँकर सेवा सुरू केली असून ऐन दिवाळीत सुरू असलेल्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी श्री अनिल भाऊ यांनी एक पाऊल पुढे जाऊन यावर मात करण्यासाठी पाण्याची टँकर सुरू केले आहे त्यामुळे आता सिन्नर करांची दिवाळी गोड होणार आहे या योगदानाबद्दल अनिल भाऊ यांची सर्वत्र कौतुक होत आहे.
      सिन्नर शहरात गेल्या आठ दिवसांपासून नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबवण्यासाठी शहा गावचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते यांनी पदरमोड करून स्वखर्चाने पाण्याचे टँकर सेवा सुरू केली आहे त्यामुळे तुर्तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने सिन्नर करांची दिवाळी गोड होणार आहे.. तालुक्यातील युवा नेतृत्व या निमित्ताने उदयास आले असून कायम सामाजिक कार्यात सहभागी होऊन गरीब व कष्टकरी यांना मदतीचा हात पुढे करणारे श्री. सरवार हे नेहमी चर्चेत आले आहे..
   शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नांवर आवाज उठवला व पाणी टंचाईचा आढावा घेतला... उदय सांगळे यांच्या पुढाकाराने अनिल भाऊ सरवार स्वखर्चाने पाण्याचे टँकर सेवा सुरू केली आहे त्यामुळे तुर्तास पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण थांबली आहे…  या कार्याचे  उदय सांगळे व अनिल सरवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

     या कौतुकास्पद योगदानाबद्दल सिन्नर मिडिया पत्रकार टिमच्या वतीने अभिनंदन केले आहे…

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई