संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक: ज्ञानेश्वर सांगळे” ए वन न्यूज महाराष्ट्र”
प्रतिनिधी नाशिक:

नाशिक:निफाड तालुक्यातील श्रीरामनगर (कोळवाडी ) निफाड येथील विविध कार्य सहकारी सोसायटीचे संचालक भीमराज काळे सर हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक पदी सर्वसाधारण गटातून निवडून आलेले आहेत. परंतु भीमराज काळे सर यांस नोकरीतून मिळणारे उत्पन्न हे शेतीच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचा खोटा पुरावा दाखल केला.
याबाबत प्रसाद अंबादास फापाळे( मरळगोई) व रोहित तात्या वावधाने (रा.मानोरी खुर्द ) यांनी सहाय्यक निबंधक फयाज मुलानी यांच्याकडे संचालक पद रद्द करावी अशी मागणी केली निबंध यांनी खोट्या पुरावाच्या आधारे भीमराज काळे सर यांची संचालक पद 29 ऑगस्ट 2025 रोजी अपात्र ठरविले होते.


परंतु भीमराज काळे सर यांनी कोणालाही विरोध न करता खऱ्या कागदपत्रांच्या आधारे विभागीय निबंध यांच्याकडे धाव घेतली आपण शेतकरी असल्याचे पुरावे सादर केले व नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शेती उत्पन्न जास्त असल्याचे सांगितले .त्या संबंधित बाजार समितीच्या शेतीमाल विकल्याच्या पावती व कागदपत्रे विभागीय निबंधक यांच्याकडे सादर केली.
या सर्व पुराव्याच्या आधारे विभागीय निबंध कार्यालयाने विचार करून भीमराज काळे सर यांना शेतकरी असल्याचा पुरावा दिला या आधारे शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी भीमराज काळे सरांच्या बाजूने ॲड.प्रमोद पाटील यांनी बाजू मांडली व निकाल भीमराज काळे सरांकडून लागला असल्याचे असल्याने संचालक पद कायम राहिले आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराज काळे सर यांचे संचालक पद विभागीय सहाय्यक निबंध यांच्याकडे लागलेल्या सुनावणीत कायम असल्याचा निर्णय झाला आहे. संचालक पद कायम राहिल्याने निफाड तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आनंदी झाले असून श्रीरामनगर (कोळवाडी )येथे फटाक्यांची व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला….

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





